
स्वप्नाच्या पलीकडे
स्वतःचे काही असावे.
अस्तित्वाचे काही
गुणगान नसावे.
प्रत्येक ठिकाणी
थोडी ओळख रहावी.
स्वतच्या जगात
आपली छोटी मोठी नाती असावी.
जगणे काहीसे
सोपेही व्हावेत.
अडचणीला काही
जागाच नसावी.
सोबतीला असावी चार चौघे
काही मित्र राहावेत.
आयुष्य सारे निघत जाते
जगण्याची मज्जा घेत जावी.



