
शिर्डी साई बाबा
देवाचे दैवत्व असे काही असावे
उभे राहुनी लांबून ही दिसावेत..
भक्तांचा भगवंत तु तुझ्या दर्शनाची
सर्वांस ओढ तुझी मनाशी जावू दे..देवा तुझ्या भक्तीचा महिमा हा
अपरंपार असाच काहीसा राहू दे..
आवाजाला साथ ही तुझी
भक्तांच्या सोबतीला तुझीच राहू दे..
भजन, कीर्तनाच्या भक्तीचा महिमा हा
तुझ्या गोड सहवासात तल्लीन होवूनी जावू दे..
भगवंता तुझ्या या भक्ताला
तुझेच होऊनी असेच राहू दे..
भक्तीच्या भावनेची आस तु
तुझी मनाशी नेहमीच राहू दे..