
मला हसताना आवडते ती
तिला रागावलेला मी..
मला तिचे सुंदर सौंदर्य
तिला तिच्यातला मी..
मला रुसलेली ती
तिला तिच्यात रमलेला मी..
मला आठवणीतली ती
तिला तिच्या पुढ्यात मी..
मला प्रत्येक सकाळ डोळ्यासमोर ती
तिला संध्याकाळी सोबत फिरायला मी..
मला हातात हात तिचा
तिला विश्वासातला मी..
मला प्रत्येक ठिकाणी हवी ती
तिला तिच्या सुख दुःखात मी..
मला प्रेमिका म्हणून ती
तिला जीवनाची साथ बनून मी..
मला जीवनात हवी ती
तिला आयुष्यभरासाठी मी..
मला समजावताना ती
तिला समजून घेण्यासाठी मी..




