तुझ्यातली मला तुच हवी
प्रियासी म्हणूनही तुच हवी
जगायास तुझी साथ हवी
जीवनाच्या वाटेवर सोबत तुच हवी
आवड म्हणूनही तुच हवी
साथसोबतीला तुझी प्रीत हवी
आठवणीच्या कारणासाठी तुच हवी
रडण्यास कारण ही तुच हवे
सुख दुःख मध्ये सोबतीला तूच हवी
जीवनाच्या पावलांना आधाराची चाल हवी
उंच भरारीला उद्दिष्ट तुझी हवी
जीवन म्हणुनी तुच हवी
प्रेरणेला जोड तुझीच हवी
शांततेत तुझे मधुर बोलणी हवी
जीवनाची छान अशी रीत हवी
श्वासात श्वास असे पर्यंत तुच हवी …..








