लहानपणीची मज्जा वेगळीच होती
शाळेसभोवती मैदाने ही होती.
शाळा आमची सकाळची होती
धावपळीची गंमत थोडी वेगळीच होती.
आईचे बोट धरून चालत जाई
शाळेच्या आवारात रडू सुद्धा येई.
लहान लहानशी वस्ती होती
सख्या सवंगड्यांची साथ जशी मोठी.
मध्ये मध्ये सुट्टी खरीच होती
तरी सुद्धा आई फटक्याने कबळी होती.
शिक्षणाचा वाटे खूप हेवा
सोबतीची चार मित्र होती.
बाईंची मनात भिती सुद्धा होती
अभ्यासाची सवय लागून गेली.
मस्तीचा नव्हता काही बहाणा
मित्रांची टोळी आगाव होती.
शाळांची गुणवत्ता यादीत होती
मस्तीसाठी मित्र शुर ही होती.
झाडांचा भवती रिंगण जशी मोठी
बसण्याचा आनंद तिथेच भेटी.
मज्जा तर खरी डब्ब्यांची होती
कोणी काय आणलं त्याची शान मोठी.
मित्र मैत्रिणींची संगत खरी होती
आयुष्यभराच्या आठवणीला तीच मोठी.
मित्रांच्या सहवासात गोडी खूप होती
त्यावेळी सगळ्यांमध्ये वेळ ही होती.
शाळा सोडूनी खूप वर्षे झालीत
आज मनात शिक्षकांची यादी होती.
लहानपणीची मज्जा वेगळीच होती
शाळेसभोवती मैदानी जशी मोठी.
वर्षातून कधी मित्र भेटून जाई
जपून राहिलीत मैत्री मित्रांची भेटी.
शाळेची मैदान अशी काही होती
चार चौघांना जोडून गेली.
आजही शाळा तशीच होती
चार एक शिक्षक बदलून गेली होती.
आठवणींचा लळा खूपच आहे
शाळेची एक वेगळीच गंमत होती.
मित्र सुद्धा आज खूपच होती
सगळ्यांना कामे जुपलेली होती.
शाळा ही शाळा होती
कल्पनेला एक पालवी होती.
शिकून सारे पुढे काही गेलो
कामाला भर होवून गेली.
मनाची ही संकल्पना अशी काही होती
शाळेत शिकण्याची आता ही इच्छा तेवढीच होती.