Happy Father’s Day

https://wp.me/pccPQU-6C

फक्त तुझ्यासाठी

# तु
Advertisement

तिच्या संवादातील मी

मला हसताना आवडते ती
तिला रागावलेला मी..

मला तिचे सुंदर सौंदर्य
तिला तिच्यातला मी..

मला रुसलेली ती
तिला तिच्यात रमलेला मी..

मला आठवणीतली ती
तिला तिच्या पुढ्यात मी..

मला प्रत्येक सकाळ डोळ्यासमोर ती
तिला संध्याकाळी सोबत फिरायला मी..

मला हातात हात तिचा
तिला विश्वासातला मी..

मला प्रत्येक ठिकाणी हवी ती
तिला तिच्या सुख दुःखात मी..

मला प्रेमिका म्हणून ती
तिला जीवनाची साथ बनून मी..

मला जीवनात हवी ती
तिला आयुष्यभरासाठी मी..

मला समजावताना ती
तिला समजून घेण्यासाठी मी..

खरचं आज शांत राहवसं वाटतयं…

अाज शांत राहावस वाटतयं
दूर कुठे तरी निघून जावस वाटतयं ,
मनात चालाणाऱ्या संघर्षाला
दूर कुठे तरी लोटाव वाटतयं…

अाज शांत राहावस वाटतयं
नको ती आपुलकीची नाती ,
नकोत त्या विश्वासाच्या गोष्टी
मनाला शांत झोपवस वाटतयं….

अाज शांत राहावस वाटतयं.
नको तो रोज रोज आठवणींचा ओझा ,
नको आपल्यामुळे कोणा दुसऱ्याला सजा
सर्वांपासून दूर राहवस वाटतयं….

खरचं
आज
शांत
राहवसं
वाटतयं….

मला सुध्दा तू अशीच एकदा भेटणा…

सुंदर तुझे हास्य

मनमोहक तुझे रूप

मला सुद्धा तू

अशीच एकदा भेटणा..

शब्दांची रचना तुझी

आहेच किती छान

मला सुद्धा तू

अशीच एकदा भेटणा..

केसात माळूनी

सुगंधित हा गजरा

मला सुद्धा तू

अशीच एकदा भेटणा..

रूप तुझेच छान

सौंदर्याचा मान

मला सुद्धा तू

अशीच एकदा भेटणा..

रूसून बसलेली

फुगवूनी गाल

मला सुद्धा तू

अशीच एकदा भेटणा..

साथ तुझी सोबतीची

नेहमीच अशी राहूनी

मला सुद्धा तू

अशीच एकदा भेटणा..

तु एकदा भेट ना..

तु एकदा भेट ना….तुझ्या आठवणीत रमतय मन
मनाच्या पलिकडे आहेतरी कोण
जिव्हाळाचा जीव हा किती आहे गोड
तुझ्यात जुळतय माझं मन…

भेटीत भेट होते तुझी छान
तुला पाहण्याचे होते मन
तुझ्या बोलण्याचे बोलच गोड
मनाला लावून जातो तुझ्या भेटीची ओढ……

स्पर्श तुझ्या आठवणींचा …..आई ……

तुझ्या त्या नजरेत
ओले होवून भिजवावे
आयुष्याच्या वाटेवर
तुझेच ऐकून राहावे.

मनात काही खंत नको
नको काही बहाणा
तुझ्या प्रीतीच्या मायेसाठी
तुझ्याजवळ राहणेचा हजार बहाणा.

मनोमनी उगीच दाटे
तुझ्या त्या गोड सवयी
तुझे हास्य तुझे बोल
आठवणीत सुद्धा तूच गोड.

In English Version 👇

https://wp.me/pccPQU-h9