
रंग हा गंध हा
रंगाने उधळला
सर्वाचे जीवन
आनंदी करण्यास आला.
रंगाने केलीच वेगळीचं मज्जा
आपल्यांच सोडा दुसऱ्या जोडा
आनंद हा सर्वांना आला
नात्यांना घट्ट करून गेला.
पाण्याचे फवारे
चौफेर उडवले
अंगावर शहारे
जाणवून आलेत.
केली सारी मौज मज्जा
आपल्यांचा आपुलकी
जसा हा सणच नवा
एकत्र आले जुडूनिया.
क्षणातील क्षण हा
वेगळाच हवा
आपल्यांचा तिथे
आपलेपणा हवा.
















