

सुर्याच्या किरणांनी
सुंदर ही पहाट झाली..
पक्षांच्या थव्यांनी
किलबिलाट सुरू केली..
फुलांच्या पाकळ्या जणू
फुलून काहीशा आल्या..
सुगंध हा हवेने
चौफेर पसरवला..
दिवस हा जल्लोषाचा
आनंद घेवून आला..
सर्वांच्या सुंदर शुभेच्छांनी
मनास हरवून गेला..
मस्ती मज्जेची
वय ही लहानशी
आईच्याच सभोतीला
मन आनंदित होई..
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा मायरा…


