स्त्री एक वास्तव्य ….

घरात एक चालती बोलती
*लक्ष्मी* पाणी भरते आहे..

*अन्नपूर्णा* होऊन
भोजन बनवत आहे…

*गृहलक्ष्मी* होऊन
कुटुंबाला सांभाळत आहे…

*सरस्वती* होऊन
मुलांचा अभ्यास घेत आहे..

*दुर्गा* होऊन
संकटाशी सामना करते आहे…

*कालिका, चंडिका* होऊन
घराचे रक्षण करत आहे…

तिची पुजा नको
पण *स्त्री* म्हणून सन्मान व्हावा..

Advertisement