

अाज शांत राहावस वाटतयं
दूर कुठे तरी निघून जावस वाटतयं ,
मनात चालाणाऱ्या संघर्षाला
दूर कुठे तरी लोटाव वाटतयं…
अाज शांत राहावस वाटतयं
नको ती आपुलकीची नाती ,
नकोत त्या विश्वासाच्या गोष्टी
मनाला शांत झोपवस वाटतयं….
अाज शांत राहावस वाटतयं.
नको तो रोज रोज आठवणींचा ओझा ,
नको आपल्यामुळे कोणा दुसऱ्याला सजा
सर्वांपासून दूर राहवस वाटतयं….खरचं
आज
शांत
राहवसं
वाटतयं….



