हास्य तुझे सुंदर मनमोहक
जगण्यास तुझ्यासोबतचे मिळाले..
रंगतला रंग हा रंगाने रंगवला
तुझ्या नावाचा मला करून गेला..
हळद ही लागली
तुझ्याच नावाची
अंगावर शहारा येई
तुलाच पाहताना
नाती ही जुळली
सुरेखशा बंधनात..
जुळुनी आल्या रेश्माच्या गाठी
दोन घरांच्या नात्यांना धरून ठेवती..
रूप तुझे सुंदर
मनाला या भावते..
तुला पाहूनी
मन हरवून जाते..
नात्यांचे हे नाती जुळूनही गेले
तुझ्या मनास जवळ करूनही गेले..
हास्य तुझे मनमोहक
पाहण्यात शोभते..
साज हा तुझा असाच काही रहावा
तुला पाहताना काही सांगून जावा..
साथ तुझ्या सोबतीची अशी काही वेगळी
जन्मभर लाभूनी आयुष्यभर रहावी..
प्रीत तुझी ही प्रेमाची
नेहमीच प्रेमळ मिळावी…






Superb poem. Very beautifully expressed your feelings. Keep writing.
LikeLiked by 1 person
Thank you so much.
You take the time to read my blog and show your likes.
LikeLike